पुणे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. शेकडो युवकांनी हातात मशाली घेऊन “मतदान चोरी बंद करा”, “तरुणांना नोकरी द्या”, “लोकशाही वाचवा” अशा आक्रमक घोषणा देत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केले.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संताप व्यक्त केला, ते म्हणाले “सरकारने लोकशाहीची गळचेपी करून निवडणुकांमध्ये उघडपणे मतदान चोरी केली आहे. बेरोजगारीचा राक्षस प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी खेळत आहे. युवकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही गप्प बसणार नाही. ही मशाल आता भ्रष्ट सत्तेला राखेत मिळवेल.”
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सरकारला इशारा देत म्हणाले, “युवकांच्या भविष्याशी गद्दारी करणाऱ्या या सरकारला आम्ही रस्त्यावर उतरून सणसणीत उत्तर देत आहोत. मतदान चोरी करून सत्तेत आलेले लोकशाहीचे खुनी आम्ही कधीच स्वीकारणार नाही. रोजगार, शिक्षण आणि हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आज मशालीतून पेटला आहे. ही लढाई आता रस्त्यावरून संसदेत जाईल आणि जनता हुकूमशाही पाडूनच थांबेल.”
Related Posts
या मशाल मोर्चात हर्षवर्धन सपकाळ, डॉ. विश्वजीत कदम, अजय चिकारा, माजी मंत्री सतेज (बंटी) पाटील, अभय छाजेड, अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, अक्षय जैन, सौरभ अमराळे, प्रथमेश अबनवे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
लोकशाहीची हत्या, मतदान चोरी आणि बेरोजगारीचा अन्याय याविरुद्ध आता अधिक तीव्र लढा छेडला जाईल. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा मशालधारी योद्धा बनून हुकूमशाहीविरोधात लढेल.
`