Katraj Dairy कात टाकणार : १०० कोटींचा अत्याधुनिक प्रकल्प होणार ; दूध प्रक्रिया क्षमता दुपटीने वाढणार
शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, स्थानिक रोजगाराला चालना
Katraj Dairy । पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज येथील मुख्यालयात अत्याधुनिक डेअरी विस्तार प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे संघाची दूध प्रक्रिया क्षमता दुपटीने (Katraj Dairy Expansion Project) वाढून तीन लाख लिटरपर्यंत पोहोचणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. (katraj dairy expansion milk processing)
सुमारे पाच एकर जागेवर उभारल्या जाणार्या या डेअरीसाठी अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी सुमारे ८० टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात उभारला जाणार असून उर्वरित निधी संघाच्या स्वतःच्या स्रोतातून भागविण्यात येईल. प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया यंत्रणा, साठवणूक केंद्रे, स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रण सुविधा यांचा समावेश असेल.
धक्कादायक ! पुण्यातील रेस्टॉरंट्सवरील छाप्यांमध्ये खासगी व्यक्तींचा समावेश
कात्रज दुध संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) अर्थसाहाय्याने या प्रकल्पाचा आराखडा तयार केला गेला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत योजनेला मान्यता मिळाली असून, महापालिकेच्या बहुउद्देशीय प्रकल्पाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे जमिनीवर प्रकल्प उभारणीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. नव्या संचालक मंडळाच्या स्थापनेनंतर या योजनेला गती देण्यात आली आहे आणि दीड वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.’
Pune Grand Challenge 2026। पुण्यातील रस्त्यांची राइड क्वालिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार
संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये म्हणाले, ‘‘दूध संकलन, प्रक्रिया आणि पिशवीबंद करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. यामुळे विद्यमान मनुष्यबळ इतर विभागासाठी वापरता येईल. जुनी यंत्रणा साठवणूक आणि अतिरिक्त मागणीवेळी उपयोगात आणली जाईल.’’
उत्पादन क्षमता वाढ आणि नवीन संधी
प्रकल्प सुरू झाल्यानंतर सध्या संकलित होत असलेल्या दुधापेक्षा जास्त प्रमाणात दूध एका ठिकाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. अनेक संस्थांनी संघाशी संपर्क साधला आहे, परंतु आधी क्षमता नसल्यामुळे त्यांचा पर्याय स्वीकारता येत नव्हता. आता प्रकल्पामुळे दुधाचे प्रमाण दुपटीने वाढेल, त्यातून संघ नफा कमविण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकेल.
कामगार व्यवस्थापन आणि स्थानिक रोजगार
हा प्रकल्प केवळ दूध प्रक्रिया क्षमतेसाठी नव्हे, तर नवीन डेअरी उपपदार्थ निर्मितीसाठीही चालना देणार आहे. आधुनिक यंत्रणेमुळे कमी मनुष्यबळात कामे होऊ शकतील आणि विद्यमान मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन करून इतर कामांसाठी कार्यक्षमता वाढेल. संघाचे वितरण जाळे अधिक मजबूत होईल, शेतकरी सदस्यांना स्थिर बाजारपेठ मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
अॅड. स्वप्नील ढमढेरे म्हणाले, ‘‘सध्या कात्रज डेअरीतील यंत्रणा साठ वर्षांपूर्वी बसवलेली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे प्रकल्पात बदल करणे आवश्यक झाले आहे. सध्या दूध, दही, ताक, तूप आणि इतर उपपदार्थांचे एकूण संकलन दीड लाख लिटर आहे, जे नवीन प्रकल्पामुळे दुपटीने वाढेल.’’