कोथरूड ते कात्रजपर्यंत नागरिकांचा पाणी मीटरला विरोध ; PMC कधी पूर्ण करणार काम ?
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुरू असलेले पाणी मीटर बसविण्याचे काम अद्यापही कासवगतीनेच सुरू आहे. महापालिकेने एका महिन्यात सर्व उर्वरित मीटर बसवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही अजून ४२ हजार पाणी मीटर बसवणे बाकी आहे.
महापालिका प्रशासनाने नागरिक आणि राजकीय विरोध असूनही पाणी मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. तरीही या कामाला गती मिळालेली नाही. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळींना मतदारांचा रोष नको असल्याने मीटर बसविण्यास विरोध वाढू शकतो.
Bike Taxi Service in Maharashtra।”Uber, Rapido ला परवाना ; बाईक-टॅक्सीचे दर जाहीर
ही योजना ३० वर्षांचा विचार करून व शहराची संभाव्य ४९ लाख लोकसंख्या गृहीत धरून आखण्यात आली होती. मे २०१५ मध्ये महापालिकेच्या सभेत मंजूर होऊन २४३५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे होते, पण आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली असून योजना अद्याप अपूर्ण आहे.
थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेने जाहीर केली व्याज माफी योजना
निवडणुकीमुळे वाढती अडचण
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील दीड महिन्यात ३६ हजार मीटर बसविले गेले. पण उर्वरित ४२ हजार मीटर बसविणे बाकी आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे काम केल्यास मतदारांचा रोष ओढवून घेण्याची भीती असल्याने मीटर बसविण्याचे काम आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार नेमका कधी, याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे.
समान पाणीपुरवठा योजनेचा आराखडा
* ७९ पाणी साठवण टाक्या
* १२६८.९७ किमी लांबीच्या जलवाहिन्या
* १०१.५४ किमी लांबीच्या टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्या
* २ लाख ३२ हजार ६५२ पाणी मीटर बसवणे
* ७ नागरी सुविधा केंद्र
* ६ नवे पंपिंग स्टेशन
कुठे होत आहे विरोध?
* कोथरूड
* कसबा पेठ
* धनकवडी
* कात्रज
* मध्यवर्ती पेठ
* ससाणेनगर
* येरवडा
* कोंढवा
* मोहम्मदवाडी
* मार्केट यार्ड