पुणे : आंबेडकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेस पक्षाचे माजी वरिष्ठ कार्यकर्ते मिलिंद अहिरे यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पुणे शहर मागासवर्गीय प्रमुखपदी निवड झाली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.
इंग्रज गेले पण शिक्षण पद्धती ठेवून गेले ; नवीन शिक्षण पद्धतीने नवी पिढी घडेल – हरिभाऊ बागडे
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा वारसा आणि पक्षप्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत पत्रात नमूद आहे. मागासवर्गीय प्रमुखपदी नियुक्तीचे पत्र शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अहिरे यांना प्रदान करण्यात आले. या वेळी सह-संपर्क प्रमुख अजय भोसले, महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे उपस्थित होते. नियुक्तीचा कालावधी एक वर्षांचा असणार आहे.
पक्षाकडून देण्यात आलेल्या निवडीच्या पत्रात नमूद आहे की, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करून, पक्षाची ताकद वाढवावी तसेच सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे.” अहिरे यांच्या निवडीमुळे पुणे शहरातील झोपडपट्टी परिसर आणि मागासवर्गीय समाजामध्ये शिवसेनेची वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.