हवेली क्रमांक १२ कार्यालयात नियमबाह्य दस्त नोंदणी?
पुणे : हवेली क्रमांक १२ येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याचा गंभीर आरोप वरिष्ठ लिपिक आर्यन कोळी यांच्यावर करण्यात आला आहे.
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
कोळी यांनी प्रभारी सह दुय्यम निबंधक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मिळकतींची तसेच अनधिकृत बांधकामाशी संबंधित दस्त नोंदणी केल्याचे आरोप आहेत. या प्रक्रियेत गोरगरीब जनतेची फसवणूक झाली असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पाटेकर यांनी केला आहे.
पाटेकर यांनी नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे कोळी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची तसेच त्यांनी प्रभारी चार्ज घेतल्यापासून ते चार्ज सोडेपर्यंत केलेल्या सर्व दस्त नोंदणींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.