...

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग ; ढोल-ताशा पथकाच्या सदस्यांवर गुन्हा दाखल 

पुणे, अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वार्तांकन करत असलेल्या एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बुधवार चौकात घडलेल्या या प्रकारानंतर पुणे श्रमिक पत्रकार संघाने पाठपुरावा केला. त्यानंतर अखेर फरासखाना पोलीस ठाण्यात त्रिताल ढोल-ताशा पथकातील दोन अनोळखी सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीने रचना इतिहास : तब्बल 35 तास चालली मिरवणूक 

 

20 वर्षीय महिला पत्रकाराने पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.15 ते 7.40 दरम्यान त्या आपल्या एका मित्रासोबत गणेश विसर्जन मिरवणुकीचे वार्तांकन करत होत्या. त्यावेळी पथकातील एका 25 वर्षीय सदस्याने लोखंडी ट्रॉलीचे चाक त्यांच्या पायावर घातले. याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याने धक्काबुक्की करत छातीला स्पर्श करून मागे ढकलले. या घटनेमुळे तक्रारदाराच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.

 

दरम्यान, सोबत असलेल्या शोएब तडवी यांनी आरोपीला जाब विचारल्यावर त्यांनाही ढकलून देत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून, आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(1), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास फरासखाना पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पूनम पाटील करत आहेत.

 

Local ad 1