पुणे, १० ऑगस्ट २०२५ : पुण्यातील आंबेगाव परिसरात स्नेहा सावंत-झेंडगे या नवविवाहितेचा मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात पुन्हा एकदा हुंडाबळीच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ९ ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला असून, ही आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
PMC वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन भरती; लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार
स्नेहा झेंडगे हिचा विवाह मे २०२४ मध्ये विशाल संजय झेंडगे याच्याशी झाला होता. लग्नावेळी सर्व मानपान व स्त्रीधन देण्यात आले होते. मात्र, सासरच्या मंडळींकडून ५० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करून स्नेहाचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ सुरू होता, असा आरोप तिच्या पालकांनी केला आहे.
व्हिडीओ : रोहन सुरवसे पाटील यांनी घेतली अजीत पवारांची भेट ; राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत?
स्नेहाने यापूर्वी वालसंग पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराबाबत तक्रार दाखल केली होती. पण, सासरकडील दबावामुळे ती तक्रार तिने मागे घेतली, असे तिच्या आईवडिलांचे म्हणणे आहे. तक्रार मागे घेतल्यानंतरही छळ सुरुच राहिला आणि अखेरीस तिचा संशयास्पद मृत्यू झाला.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्नेहाचा नवरा विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे आणि सासू विठाबाई झेंडगे यांच्याविरुद्ध हत्या, हुंडाबळी, मानसिक-शारीरिक छळ आणि हुंडा प्रतिबंधक कायदा याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
सामाजिक संताप; कडक कारवाईची मागणी
या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली असून, स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देत दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. “पैशाच्या लोभापोटी महिलांचा बळी देणाऱ्यांना जरब बसली पाहिजे, अन्यथा आम्ही आक्रमक पावले उचलेन,” असा इशाराही त्यांनी दिला.