मुंबई : केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्रातील १२ राज्यसेवा अधिकाऱ्यांची २०२४ साठी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये पदोन्नतीसाठी निवड झाली आहे. ही पदोन्नती १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत निर्माण झालेल्या रिक्त जागांसाठी आहे.
या अधिकाऱ्यांची निवड IAS (भरती) नियम, १९५४ अंतर्गत, राज्य सरकारच्या संमतीने आणि युनियन लोकसेवा आयोगाच्या (UPSC) शिफारशीनुसार करण्यात आली आहे.
IAS पदोन्नती यादी २०२४ (महाराष्ट्र संवर्ग)
- विजयसिंह शंकरराव देशमुख
- विजय साहादेव भाकरे
- त्रिगुण शामराव कुलकर्णी
- गजानन धोंडीराम पाटील
- महेश भास्करराव पाटील
- पंकज संतोष देवरे
- मंजीरी मनोलकर
- आशा अफझल पठाण
- राजलक्ष्मी शफिक शाहा
- सोनाली निलकंठ मुळे
- गजेंद्र चिंतामनराव बवणे
- प्रतिभा समाधान इंगळे
या सर्व अधिकाऱ्यांची पदोन्नती महाराष्ट्र राज्य प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ गट-अ (Group-A) मधून करण्यात आली आहे. मात्र, ही पदोन्नती ओए क्रमांक 236/2021 आणि 237/2021 तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणांच्या अंतिम निकालावर अवलंबून राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.