...

पुणे महापालिकेच्या 142 कोटींच्या सुरक्षारक्षक पुरवठा निविदेला मंजुरी

1565 सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट

पुणे : पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध अस्थापनांना सुरक्षारक्षक पुरवण्यासाठी 142 कोटींच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या निविदेनुसार स्मार्ट सर्व्हिसेस, सैनिक आणि क्रिस्टल या तीन कंपन्यांना एकूण 1565 सुरक्षारक्षक पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !  

महापालिकेच्या मुख्य इमारत, दवाखाने, उद्याने, क्षेत्रीय कार्यालये, मैदाने आणि इतर ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसाठी ही निविदा काढण्यात आली होती. यापूर्वी निविदा प्रक्रियेत विविध वाद निर्माण झाले होते. सुरक्षारक्षक कामावर नसतानाही पगार दिला जाणे, वेळेत पगार न मिळणे, भविष्यनिर्वाह निधी न भरणे आणि गणवेश न मिळणे या समस्या समोर आल्या होत्या.

हडपसर ते यवत उड्डाणपूल प्रकल्पाला गती ; २२ ऑगस्टला निविदा उघडणार

यंदाच्या निविदेमध्ये या सर्व बाबींचा विचार करून सुरक्षारक्षकांना योग्य सुविधा आणि वेळेत पगार देण्याची हमी प्रशासनाने दिली आहे. सुरक्षा रक्षकांचा मेडिक्लेम घेतला जाणार असून इतर सर्व भत्ते आणि कामावर असताना अपघात झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी माहिती सुरक्षा विभाग प्रमुख राकेश विटकर यांनी दिली आहे.

स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीला 900, सैनिक कंपनीला 600 आणि क्रिस्टल कंपनीला 165 सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम देण्यात आले आहे.


Local ad 1