पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी ; वनाज – चांदणी चौक आणि रामवाडी – वाघोली नवीन मार्ग
पुणे मेट्रो विस्तारास केंद्राची मंजुरी; ₹3626 कोटींचा प्रकल्प
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली असून, या निर्णयामुळे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विस्तार प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. (pune metro phase 2 approved vanaz ramwadi expansion)
राज्य सरकारचा ‘प्रभागराज’ ! महापालिकांच्या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांचा डाव?
टप्पा-२ अंतर्गत वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) हे दोन उन्नत मार्ग प्रस्तावित आहेत. या मार्गांद्वारे वनाज–रामवाडीच्या सध्याच्या मार्गाचे दोन्ही टोकांनी विस्तार करण्यात येणार आहे.
नवीन १२.७५ किमी लांबीच्या या विस्तारात एकूण १३ स्थानकं असतील. ही स्थानकं बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांशी मेट्रो नेटवर्क जोडतील. IT हब्स, शैक्षणिक संस्था, निवासी व व्यावसायिक क्षेत्रांतील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय मिळणार आहे.
पुण्यात जाहिरात फलकांसाठी बेकायदा वीजजोड ; महापालिकेच्या तपासणीत फक्त ८७ प्रकरणे उघड
जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्थानक या मार्गांना Line – 1 (निगडी–कात्रज) आणि Line – 3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडणार आहे. तसेच चांदणी चौक आणि वाघोली येथे आंतरशहर बस सेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे मुंबई, बेंगळुरू, छत्रपती संभाजीनगर यासारख्या शहरांतील प्रवाशांसाठी थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
एकूण ₹३,६२६.२४ कोटींचा खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प महा-मेट्रोमार्फत पुढील ४ वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे. पुण्यासाठी ही एक निर्णायक पायरी ठरणार आहे, जी शहराच्या स्मार्ट आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला चालना देईल.