...

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने रेयांशला जीवनदान ; १० लाखांची शस्त्रक्रिया विनामूल्य

जिल्हा प्रशासन आणि समाजातील दात्यांच्या मदतीने उभारला निधी

विटा (जिल्हा सांगली) 18 जून : सहा वर्षांच्या रेयांश अवधूत पवार याच्या हृदयाशी संबंधित जन्मजात दोषावर अत्यंत जोखमीची आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे, तब्बल १० लाख रुपये खर्चाची ही शस्त्रक्रिया पालकांना एकही रुपया खर्च न करता झाली. या यशस्वी वाटचालीमागे जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, तसेच समाजातील दात्यांचे मोलाचे योगदान आहे. (sangli reyansh pawar life saving heart surgery)

 

बिग ब्रेकिंग ; जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार, पाच गंभीर जखमी

 

रेयांशचे वडील कपड्याच्या दुकानात काम करत असून, आई गृहिणी आहे. दीड महिन्याचा असतानाच त्याच्या हृदयावर पहिली शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये विटा येथे झालेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या इको शिबिरात त्याच्या हृदयाच्या झडपेमध्ये दोष आढळून आला. काही तज्ज्ञ डॉक्टरांनी संभाव्य धोका लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.

 

Video। कुंडमळा पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार 

 

या जोखमीच्या परिस्थितीतही जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेतून १.७५ लाख रुपयांची तात्काळ मदत मंजूर झाली. उर्वरित ८.२५ लाख रुपये उभारण्यासाठी जिल्हाधिकारी काकडे यांनी ठाणे येथील MRR हॉस्पिटलशी समन्वय साधला. हॉस्पिटल व्यवस्थापक योगेश खाचणे यांनी औद्योगिक दात्यांमार्फत आवश्यक निधी उभारला.

 

पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन

 

बालहृदयतज्ज्ञ डॉ. सारंग गायकवाड आणि डॉ. निलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही १३ तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सांगली येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी आणि अनिता हसबनीस यांचेही सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रेयांश आता ठणठणीत आहे. पवार कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आभार मानले.
या घटनेतून सामाजिक संवेदनशीलता, प्रशासकीय तत्परता आणि वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाचा उत्कृष्ट प्रत्यय आला आहे.

Local ad 1