“स्थानिक निवडणुकीत एकला चलो की आघाडी? – सुप्रिया सुळे यांचा निर्णायक इशारा !
एकत्र लढायचं की नाही, टप्प्याटप्प्याने ठरेल
स्थानिक स्वराज्य संस्था 2025 । पुणे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्ष स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि राजकीय परिस्थिती पाहून टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. (supriya sule local elections decision workers based)
महायुती म्हणून निवडणुकीत यश हमखास – उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आत्मविश्वास
सुळे म्हणाल्या, “महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसारख्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात. त्यामुळे त्यांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. पूर्वी काँग्रेससोबत आघाडीत असूनही अशा निवडणुका स्वतंत्रपणे लढल्याचं इतिहासात पाहायला मिळतं.” महायुती काय निर्णय घेईल, हा त्यांचा विषय असला तरी महाविकास आघाडीत असूनही राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र विचार करून निर्णय घेईल, असंही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र सरकारकडून रिअल इस्टेट क्षेत्राला कोणती आश्वासने मिळाली?
राहुल गांधींनी निवडणूक गैरप्रकारावर केलेल्या भाष्याबाबत, सुळे म्हणाल्या की, “काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे सर्व माहिती दिली आहे. आता आयोग पारदर्शक चौकशी करेल, अशी अपेक्षा आहे.”
महिला आरोग्य अधिकाऱ्यांशी गैरवर्तन भाजप नेत्याला भोवले ; पुणे महापालिकेत प्रवेश बंदी !
“दोन भाऊ एकत्र आल्यास राज्यसेवा साध्य होईल”
शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे (राज ठाकरे) यांच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “दोन भाऊ एकत्र येत असतील आणि राज्यसेवा करणार असतील, तर ही अतिशय आनंदाची बाब आहे.”