...

Operation Sindoor। पहलगाम हल्ल्याचा बदला घेतल्याचा आनंद – रोहन सुरवसे-पाटील

Operation Sindoor। पुणे : २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी धर्म विचारून केवळ पुरूषांना मारले. या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर संबंध देशात तीव्र संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या हल्ल्याला योग्य उत्तर देतील, असा विश्वास होता, त्यानुसार त्यांनी मंगळवारी रात्री ते करुन दाखवले. भारतीय सैन्यांनी जी कामगिरी केली आहे, त्यांना सलाम, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. (Happy to have avenged the Pahalgam attack – Rohan Suravase-Patil)

 

 

पहलगाम  घटनेच्या अवघ्या १५ दिवसातच भारतीय लष्कराने पाकव्याप्त  काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हल्ला केला आणि पहलगामच्या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला, याचा मनस्वी आनंद झाला असून, यासाठी भारतीय सैन्याचे मानावे तेवढे आभार कमी असल्याचे मत स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे-पाटील यांनी बुधवारी (दि. ७) व्यक्त केले. पुढे बोलताना, सुरवसे-पाटील यांनी भारतीय लष्कराने मंगळवारी-बुधवारी मध्यरात्री २५ मिनिटांत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत १०० हून अधिक दहशतवाद्यांना मारले.

 

देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी भारतीय लष्कराने करुन दाखवल्याचे सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) द्वारे भारतीय वायू सेनेने मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिट म्हणजेच अवघ्या २५ मिनिटांत पाकिस्तानला जेरीस आणले. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानमध्ये घुसून घेतलेला बदला हे भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक आहे अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

Local ad 1