“हे” 11 ॲप तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर तात्काळ हटवा (Mobile app)
दिल्ली : मोबाईलमध्ये आपल्या उपयोगात येणारे मोबाईल अॅप (Mobile app) डाउनलोड करत असतो. आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्ले स्टोअरवर अशी अनेक ॲप आहेत. जे आपल्याला आपल्या अडचणीच्या काळात मदतीचे वाटतात परंतू हेच ॲप आपल्यावर पाळत ठेऊन आपले बँक खाते रिकामे करतात. हे आपल्याला माहित नसते मग अचानक एका दिवशी आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात. तेंव्हा आपण सायबर पोलिसांची मदत घेऊन आपली गेलेली रक्कम मिळविण्यासाठी जंगजंग पछाडतो. परंतु आपल्या हाती येते ती निराशा यापासून वाचण्यासाठी आपण सतर्क असने आवश्यक आहे. (If you have these 11 apps in your mobile, delete them immediately)
गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर अनेक धोकादायक अँड्राईड अॅप (Android App) सापडल्याची बाब आता समोर आली आहे. सायबर सिक्युरिटी सिसर्चर Zscaler च्या ThreatLabz च्या रिपोर्टनुसार प्ले स्टोअरवर ११ धोकादायक अॅप (Mobile app) आढळली आहेत, या ॲपच्या माध्यमांतून बँकिंग फ्रॉड (Banking fraud) च्या घटना घडू शकतात असा इशारा तज्ञांनी दिला आहे. (If you have these 11 apps in your mobile, delete them immediately)
मोबाईल धारकांनो मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी ठरल्यापेक्षा आता या क्षणी खाली दिलेले ॲप तात्काळ आपल्या मोबाईलमधून हटवा व आपला मोबाईल सुरक्षित करा.
1. Free Affluent Message
2. PDF Photo Scanner
3. delux Keyboard
4. Comply QR Scanner
5. PDF Converter Scanner
6. Font Style Keyboard
7. Translate Free
8. Saying Message
9. Private Message
10. Read Scanner
11. Print Scanner