पुणे ग्रामीण पोलिसांनी 230 सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन लावला खुनाचा छडा

पुणे : अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणाला वडीलानी विरोध केला. तर आईचा मुलीच्या प्रेमाला पाठींबा होता. वडिलांच्या सततचा विरोध असल्याने आईने आणि मुलगीने वडिलांना पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर वेब सिरीज (Web series) पाहून मृतदेहाची प्रियकराच्या मदतीने विल्हेवाट लावली. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) तब्बल 230 सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन खुनाचा छडा लावला. (After checking 230 CCTV cameras, the murder was solved)

 

 

 

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या (Shikrapur Police Station) हद्दीत एक मृतदेह जळालेल्या स्थितीत मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर आई-मुलगी आणि मुलीचा प्रियकर याला अटक केली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल (Pune Rural Superintendent of Police Ankit Goyal) यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी तपास अधिकारी उपस्थित होते. जॉन्सन कॅजिटन लोबो (Johnson Cajine Lobo) (वय 49, गुडवील, वृंदावन आंनद पार्क वडगाव शेरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.( (Pune Rural Police checked 230 CCTV cameras and traced the murder)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून केल्यानंतर कोणताही पुरवा आरोपींनी मागे सोडला नव्हता. परंतु, पोलिसांची सर्व भिस्त ही सीसीटिव्ही कॅमेरे वर होती. त्यांना एक चार चाकी संशयित वाहन आढळून आले. त्याची माहिती घेतली. त्यानंतर या घटनेचे धागेधोरे पोलिसांच्या हाती लागले. सुरुवातील अँग्नेल जॉय कसबे (वय २३ वर्षे, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी) याला ताब्यात घेवून चौकशी केली. त्याने संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३ वर्षे, रा. रा. ए १६, तिसरा मजला गुडविल वृंदावन आनंदपार्क वडगाव शेरी पुणे), आणि आल्पवयीन मुलीने संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिली.

 

 

1 जून रोजी सकाळी साडे सात वाजल्याच्या सुमारास शिकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथे पुणे-अहमदनगर हायवे रोड (Pune-Ahmednagar Highway) लगत गवारे यांचे एच. पी. पेट्रोल पंपाजवळ अज्ञात इसमाने अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. खुन करून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत पेट्रोल टाकुन जाळुन टाकले होते. यामध्ये यातील मृतदेह हा पुर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण जात होते. याप्रकरणी शिकापूर पोलीस स्टेशन (Shikapur Police Station) येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे दोन तपास पथके तयार करून गुन्हयाचा तपास सुरू करण्यात आला. पथकामार्फत तपास करीत असताना शिकापूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी (Two teams of Shikrapur Police Station and Local Crime Branch) सुमारे 230 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे शिकापूर ते चंदननगर वडगाव शेरी (CCTV Cameras Shikapur to Chandannagar Vadgaon Sherry) पुणे असे सलग चार दिवस -रात्र पाहून गुन्हयात वॅगनअर कारचा सहभाग असल्याचा छडा लावला.

Umang mobile app । उमंग मोबाईल अ‍ॅपवरही मिळणार डिजिटल सातबारा

 

आरोपी कसबे याचे मयताच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते, मुलीने वडिलांना कायमचा दूर करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या काईम वेब सिरीज पाहून कट रचला आणि आरोपींनी संगणमत करून जॉन्सन कॅजीटन लोबो याचा 30 मे रोजी रात्रीचे वेळी त्याचे घरातच डोक्यात वरवंटयाने मारून तसेच मानेवर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवले आणि विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्यासाठी 31 मे रोजी रात्री मृतदेह वॅगनआर कारमध्ये टाकून सणसवाडी जवळील एचपी पेट्रोल पंपाचे अलीकडे पुणे ते अहमदनगर हायवे रोड लगत कार थांबवून मयतास हायवे रोडलगतचे नाल्यात टाकून त्याचेवर पेट्रोल टाकून त्यास पेटवून दिल्याचे कबुली दिली.

 

पतीचा मोबाईल पत्नी वापरत होती…

विशेष म्हणजे पत्नीने हत्या केल्या नंतर नातेवाईकांना व शेजारी यांना समजु नये म्हणून त्यांनी मयताचा फोन चालूच ठेवून त्यावरून रोज व्हॉटसअप स्टेटस ठेवणे सुरू केले होते. मयताची पत्नी हीचा वाढदिवस 4 जून रोजी असल्याने आरोपी अँग्नेल कसबे याने पतीच्या मोबाईल वरून पत्नीचे वाढदिवसाचे स्टेटस ठेवले जेणेकरून मयत हा जिवंत आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा बारकाईने तपास करून गुन्हा उघडकीस आणलेला असून, आरोपींना काल अटक करण्यात आलेली असून, न्यायालयाने त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.

Local ad 1