पुण्यात गॅस तुटवडा? युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उद्योग आणि लग्नसमारंभांवरही परिणाम

मध्यपूर्वेतील युद्धपरिस्थितीचा परिणाम पुण्यात जाणवू लागला आहे. शहरात एलपीजी गॅस तुटवड्याच्या तक्रारी वाढल्या असून युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.