...

महिला दिन विशेष : युवक काँग्रेसकडून महिला सह जिल्हा निबंधक व सह दुय्यम निबंधकांचा पुष्पगुछ देऊन सन्मान

पुणे : आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. नारी शक्तीचा सन्मान करण्याचा, महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस म्हणून महिला दिनाच्या औचित्याने जगभरात महिलांच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवले जातात. पुणे सह जिल्हा निबंधक वर्ग एकचे संतोष हिंगाणे व सह जिल्हा निबंधक वर्ग दोनचे मंगेश खामकर यांच्या पुढाकाराने महिला अधिकाऱ्यांचा सन्मान म्हणून शहरातील सर्व दुय्यम निबंधक हवेली क्र.1 ते 27 या 27 कार्यालयाचा पदभार 7 मार्च (दि. 08/03/2025 सुट्टी असल्यामुळे) सर्व महिला अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. (Youth Congress honours woman with bouquet on Women’s Day)