...

वाल्मिक कराडला पुण्यात राहण्यास कोणी मदत केली ; शिवसेनेने केली ‘ही’ मागणी

पुणे : बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या हत्तेमध्ये मुख्य संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड हा मागील २२ दिवस महाराष्ट्र सरकारला, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस प्रशासनाला (Maharashtra Government, Chief Minister, Home Minister, Police Administration) गुंगारा देत फिरत होता, त्यातील बरेच तो दिवस पुण्यात असल्याचे त्याच्या सोबत असलेल्या बिडच्या माजी नगरसेवकाने मीडिया सोबत बोलतानाच्या सांगितले आहे. याच अर्थ वाल्मिक कराड हा पुण्यातच वास्तव्यास होता. त्यामुळे पुण्यात त्याला कोणी मदत केली याची पण सखोल चौकशी व्हावी, त्यांना सहआरोपी करा, अशी मागणी शिनसेसेनेचे (युबीटी) शहरप्रमुख संजय मोरे यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. (Who helped Valmik Karad to live in Pune?)