...

पुणे महापालिकेचा मालमत्ता कर थकबाकीदारांना मोठा झटका ; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून नळ कनेक्शन होणार कट

पुणे : मालमत्ता कर (Property tax) हा पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, मालमत्ताधारक कर भरत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. दरम्यान, पुणे महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने (Taxation and Tax Collection Department) वसुली मोहिस सुरु केली आहे. त्याला ही फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कर आकारणी व कर संकलन विभागाने  कठोर पावले उचालयचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदाराचे पाणी बंद होणार आहे. (Water connections of property tax defaulters in Pune will be disconnected)