...

Transfers of IAS officers in Maharashtra । राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु  

मुंबई । राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून, मंत्रीमंडळाचा विस्तार ही झाला आहे. त्यामुळे आता आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना बदली होण्याची भिती आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘क्रिम पोस्ट’ (Cream post) मिळवली आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री बदल्याने ते आपल्या मर्जित अधिकाऱ्यांना  ‘क्रिम पोस्ट’ देतील अशी शक्यता असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. तीन दिवसांपूर्वी 23  अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यातच  मंगळवारी  पुन्हा 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात महसूल विभागातून पदोन्नती मिळवून आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Transfers of IAS officers in Maharashtra)