Pune Book Festival । तिसऱ्या दिवशी परीक्षेच्या पूर्वतयारी मार्गदर्शकांपासून ते भक्तीपर कवितेचा आस्वाद

Pune Book Festival पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाने आपल्या 9 दिवसांच्या वेळापत्रकाच्या ३ ऱ्या दिवशी यशस्वीपणे नियोजित विविध कार्यक्रमांचा आयोजन केले. या फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी काहीतरी विशेष होते, जे लहान मुले, विद्यार्थी आणि प्रौढांचे लक्ष वेधून घेत होते. “माझ्या ऑलिम्पियाडच्या तयारीसाठी मला खरोखरच योग्य पुस्तकांची गरज होती आणि शेवटी ती मला इथे सापडली !” असे  पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.