...

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी  सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांची नियुक्ती

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहरात संघटनात्मक पुनर्रचनेचा मोठा निर्णय घेत, प्रथमच दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पूर्व पुण्यासाठी माजी आमदार सुनील टिंगरे तर पश्चिम पुण्यासाठी माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यावर पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. या बदलाचे औपचारिक घोषण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली.