धक्कादायक : महिलांमधील कर्करोगात भविष्‍यात वाढ होण्याची भिती !

पुणे : जीवनशैलीतील बदल, चुकीची जीवनशैली, पर्यावरणीय घटकांमुळे महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख, यकृत कर्करोगाचे (Breast, lung, cervical, liver cancer) प्रमाण वाढत असल्‍याचे समोर आले आहे. गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे वाढते प्रमाण चिंताजनक असले तरी वेळीच निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे जगण्याची शक्‍यता आणि जीवनमान सुधारू शकते असे तज्‍ज्ञांचे मत आहे. (Shocking: Fears of increase in cancer among women)