...

पुणेकरांचा नाद करायचं नाही ; पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केल्या 10 हजारांहून अधिक वाहने

पुणे, गुढीपाडवाच्या मुहूर्त साधत तब्बल यंदा १० हजार १७० वाहनांची खरेदी करण्यात आली. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक म्हणजेच ६ हजार ५१० एवढी आहे. त्यानंतर कार, रिक्षा (Car, rickshaw) आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. गुढीपाडवा, अक्षयतृतीया आणि दसरा (Gudipadwa, Akshaya Tritiya, Dussehra) या शुभ मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी नागरिकांची रेलचेल असते. विशेषतः गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन, वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधत अनेकजण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. मुहूर्तावर वाहन घरी आणण्यासाठी अनेकजण अगोदरपासूनच बुकींग करून ठेवतात.  (Pune residents buy 10,000 vehicles on Gudi Padwa)