...

पुणे जिल्हा हा पर्यटनाचे हब म्हणून ओळखला जाईल –  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : पुणे जिल्हयात सर्व प्रकारची मोठ्या प्रमाणात पर्यटनाची स्थळे अधिक आहे. त्याला चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या नोव्हेबरमध्ये कृषी पर्यटन परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये खाजगी विविध गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या माध्यमातून शासन व गुंतवणूकदार एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात पर्यटन केंद्रे विकसित केले जातील. त्यामुळे पुणे जिल्हा हा पर्यटनाचे हब म्हणून ओळखला जाईल (Pune district will be known as a tourism hub) असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (District Collector Jitendra Dudi) यांनी केले.