The third wave of corona । संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी महत्वाचे विधान

The third wave of corona । नाशिक : राज्यात कुठेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झालेली नाही, मात्र दिवाळी नंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे टास्क फोर्सने अंदाज व्यक्त केला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. (Probably the third wave will come after Diwali)

 

 

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोना निर्बंध काळजीपूर्वक निर्बंध शिथिल केले आहेत, जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलत आहे. अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली आहे, असेही टोपे म्हणले. (Probably the third wave will come after Diwali)

 

 

कोरोनाचे रुग्ण कमी झाले तरी चाचण्या कमी करण्यात आले नाही. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे. दुसरी लाट ओसरली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत एक सुध्दा मृत्यू नाही, हा लसीकरणाचा फायदा असल्याचेही टोपे यांनी सांगितले. (Probably the third wave will come after Diwali)

 

 

लहान मुलांना लस देण्यास सज्ज

केंद्र सरकारने 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्याची घोषणा केली आहे. डोस उपलब्ध झाले आहेत, लहान मुलांच्या लस घेण्यासाठी इलिजीबल केलं असेल, तर आम्ही द्यायला तयार आहोत. लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी द्यावी, असी आमची केंद्र सरकारला मागणी असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

 

Local ad 1