...

Nanded Vidhan Sabha Election 2024 नांदेड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार ? जाणून घ्या

Nanded Vidhan Sabha Election 2024 ।नांदेड ः नांदेड  जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघ असून, त्यात काँग्रेसचे चार, भाजपचे तीन आणि शेकाप आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार विजयी झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फुट आणि त्यानंतर झालेल्या पक्षांतरांमुळे उलटफेर झाले आलेत. मात्र, एकेकाळी नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होता. परंतु अशोच चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने हा किल्ला ढासळतो की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा काँग्रेसचे वसंत चव्हाण यांनी पराभव केला. त्यामुळे नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला शाबुत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत काय होते, हे पहाणे महत्नाचे आहे. (Nanded Vidhan Sabha Election 2024 How many MLAs of which party?)