नांदेडकरांनो घाबरू नका! पेट्रोल साठा पुरेसा आहे; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले पंप बंद होण्याचे खरे कारण

नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याच्या अफवांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी खंडन केले आहे. इंधन साठा पुरेसा असून नागरिकांनी पॅनिक पर्चेस टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.