...

एसटी वेबसाइटवर बंद बससेवेचे तिकीट आरक्षण सुरूच

पुणे – महाबळेश्वरच्या सहलीसाठी उत्साहाने निघालेल्या नवविवाहित जोडप्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) निष्काळजीपणामुळे मनस्ताप सहन करावा लागला. एसटीच्या अधिकृत वेबसाइटवरून त्यांनी ‘स्वारगेट–महाबळेश्वर ई-शिवाई’ बससाठी ऑनलाइन तिकीट आरक्षित केले होते. मात्र, प्रवासाच्या दिवशी पुण्यातील स्वारगेट स्थानकावर पोहोचल्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही बससेवा दोन वर्षांपूर्वीच बंद झाली आहे. (msrtc online ticket error mahabaleshwar route)