...

कोंढवा येथील कतलखान्या संदर्भात पुणे महापालिकेला महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने बजावली नोटीस

महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra State Pollution Control Board) काेंढवा येथील कत्तलखान्या (Slaughterhouse in Kondhwa) संदर्भात नोटीस पुणे महापालिकेला (MPC Board issues notice to PMC) नोटीस बजावली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आवश्यक त्या उपाययाेजना करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत महापािलकेने मंडळाकडे मागितली आहे. त्यानुसार कामे पुर्ण केली जातील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच कत्तलखान्यासाठी नवीन जागा शाेधली जात आहे, असेही सांगण्यात आले. ( issues notice to Pune Municipal Corporation)