...

१ कोटी २० लाखांचा मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

पुणे | नववर्षाच्या स्वागताच्या (Happy New Year) पार्टीमध्ये दारुचा वापर मोठ्या प्रणाणात होत असतो. ही संधीचा फायदा घेण्यासाठी मद्य तस्कर सक्रिय होतात. गोवा राज्यात निर्मित मद्य कमी किंमतीत आणून ते महाष्ट्रातील किंमतीत बेकायदा विक्री केली जाते. त्यातून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातो. अशा प्रकारे बेकायदा मद्य विक्री आणि वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. गोवा बनावटीचे मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ९ आरोपींना अटक करुन विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या व ५ वाहने जप्त केली आहेत. पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत उपअधीक्षक श्री.संतोष जगदाळे यांच्या मार्गदर्सनात ही कारवाई सासवड विभागाने केली आहे. (Liquor worth 1 crore 20 lakhs seized by the State Excise Department)