Ready Reckoner Rate : घर, जमीन खरेदीच्या किंमती आजपासून  वाढल्या ; रेडीरेकनकरच्या दरात घसघसीत वाढ

पुणे : आजपासून म्हणजेच 1 एपिल ते 31 मार्च 2026 पर्यंत राज्य शासनाकडून वार्षिक बाजारमूल्य दरात म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात वाढ केली आहे. गेल्या दोन वर्षांनंतर प्रथमच ही वाढ करण्यात आली असून, सरासरी ही वाढ ४.३९ टक्के करण्यात आली आहे. तर राज्यातील महापालिकांच्या क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ५.९५ टक्के वाढ करण्यात आली असून, ग्रामीण भागात ३.३६ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.