AI चा प्रशासनात प्रभावीपणे वापर ;  सायबर सिक्युरिटी अवेअरनेसाठी प्रशिक्षण

नांदेड : तहसील कार्यालय नांदेड येथे  मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. (Effective use of AI in administration)