Deenanath Mangeshkar Hospital । अनामत रक्कम मागण्यासाठी डॉ. सुश्रुत घैसास यांच्या डोक्यात कुठून आला ‘राहू केतू’ – डॉ. धनंजय केळकर

Deenanath Mangeshkar Hospital । पुणे, गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात पहिल्यादांच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Deenanath Mangeshkar Hospital) वतीने रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर (Dr. Dhananjay Kelkar) यांनी डॉ. घैसास यांचा राजीनामा घेतल्याचे सांगत घटनेची माहिती दिली. तेव्हा केळकर म्हणाले, त्या दिवशी नेमके डॉ. घैसास यांच्या डोक्यात कोणता राहू, केतू आला आणि त्यांनी दहा लाख रुपये डिपॉझिट लिहून चौकोन केला, हे समजले नाही. (Dr. Sushrut Ghaisas head was affected by ‘Rahu Ketu’ – Dr. Dhananjay Kelkar)