तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेवू नका ; पुणे महापालिकेची 860 रुग्णालयांना नोटीस

: तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका, अशा स्वरुपाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना काढली आहे. अनामत रकमेसाठी अडवणुक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत रुग्णालयावर कारवाई करण्याचा ईशाराआरोग्य विभागाने दिला आहे. (Do not take a deposit for emergency treatment)