महापालिकेच्या डांबर खरेदी निविदेला स्थगिती देण्याची मागणी

पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाने डांबर खरेदीसाठी निविदा मागवली आहे. ही निविदा १२६ कोटी रुपयांची असून ती तीन वर्षासाठी असणार आहे. यामध्ये महापालिकेचे ऑईल कंपन्याकडून मिळणाऱ्या सवलतीचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे.