...

येरवडा मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांनी अंडरवेअर खरेदीतही केला भ्रष्टाचार

पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्‍णालयात (Yerwada Regional Psychiatric Hospital) खरेदी प्रक्रियेत एक ते दीड कोटी रुपयांचा भ्रष्‍टाचार झाल्‍याचे उघडकीस आले आहे. यामध्‍ये स्‍वच्‍छता कंत्राट, सौर व उष्‍ण जल संयंत्र, किरकोळ साहित्‍य, व्‍यसनमुक्‍तीसाठी लागणारे साहित्‍य इतकेच नव्‍हे तर मनोरुग्‍णांसाठीच्‍या आंतरवस्‍त्र खरेदीमध्‍येही पैसे खाल्‍ल्‍याचा प्रकार घडला आहे. या भ्रष्‍टाचाराची सुरवात २०१७ पासून झालेली असली तरी सध्‍याचे रजेवर असलेले रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांच्‍या काळात या आर्थिक अफरातफरीने कळस गाठल्‍याचे समोर आले आहे. (Regional Mental Hospital officials also committed corruption in the purchase of “underwear”)