...

12th result । हुश्श… बारावीच्या परीक्षेत राज्यातील १३.३९ टक्के विद्यार्थी काठावर पास

पुणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४४.५१ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्क्यांच्या आतच गुण मिळाले आहेत. तर केवळ ०.६ टक्के विद्यार्थी ९० टक्क्यांच्या पुढे असून, ४५ टक्क्यांच्या आत म्हणजे काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी १३.३९ इतकी आहे. (13.39 percent students pass the 12th exam)